मंगळवार, १५ एप्रिल, २०१४

dr. babasaheb ambedkar

          काल आमच्या विभागात डॉ . बाबासाहेब आंबेडकरांची १२६ वी जयंती साजरी झाली . विभागातील सर्व वातावरण "जय भिम मय" झाले होते. सर्व अबाल-वृद्धांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता . या विभागाचे नाव डॉ . आंबेडकर नगर आहे. येथे बहुतेक लोक एकाच धर्माचे असल्यामुळे या दिवसाला एखाद्या सणाचे स्वरूप आले होते. ढोल, ताशे, डिजे या सारख्या वाद्यांनी वातावरणाला नवा साज चढवल्या सारखे वाटत होते. ज्या महामानवाने त्यांना जगण्याची दिशा दाखवली त्या महामानवास आदरांजली वाहण्यासाठी सगळी जनता आतुर झाली होती. फारच मोठ्या जोशात दिमाखदार पणे  बाबासाहेबांच्या मूर्तीची शोभा यात्रा निघाली  तो क्षण अवर्णीय होता. मला फार आनंद वाटला. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या  बाबासाहेबांना मनापासून मी हि आदरांजली वाहत आहे. समाजातील तळागाळाच्या लोकांमध्ये आत्मविश्वास जागृत करणाऱ्या या महान नेत्याला पाहू शकलो नाही तरी त्यांची यशोगाथा ऐकू शकलो, वाचू शकलो. त्यातून बोध घेऊन आपण हि नवा इतिहास घडवू असा संकल्प सोडून आज मी आपले लेखनास विराम देत आहे.