बुधवार, ९ जुलै, २०१४

Aamhi Savitrichya Leki

        सावित्री बाई फुले म्हटल्या बरोबर लहान मुलाला आई हा शब्द ऐकल्यावर जसे वाटते ना ? अगदी तसेच आम्हां मुलींना वाटते .  आई ह्या शब्दातच इतकी प्रचंड शक्ति आहे कि सारे जग एका बाजूला आणि आई एका बाजूला . अगदी तसेच आज सावित्री बाई फुलें यांच्या क्रांतिकारी निर्णया मुळेच आजच्या विसाव्या शतकात , आपल्या पंखात विद्वत्तेचे   बळ  घेऊन नाव- नवीन शिखरे पादांक्रांत करीत आहोत.  याची जननी , माता , आई ह्या सावित्री बी फुलेच आहेत. हे सत्य सूर्य प्रकाश इतकेच खरे आहे. 
          सावित्री बाईंचा सातारा येथे झाला. एकोणिसाव्या शतकात जेंव्हा समाजात ब्राह्मणांचे वर्चस्व होते तेव्हा समाजात फार विषमता होती . स्पृश्य -अस्पृश्य , जाती -पाती ,सती प्रथा , बाल विवाह , अनिष्ठ रूढी , परंपरा यांनी समाज वेढलेला होता . त्या काळी मुलींना शिक्षण दिले जात नसे . महात्मा ज्योतिबा फुले हे सावित्री बाईंचे पती  ते समाज सुधारक म्हणून ओळखले जात . त्यांनि  समाजातील विषमतेचा अभ्यास केला . तेंव्हा त्यांना असे दिसून आले कि घर चालवणारी घरची स्त्री हीच मुळात अशिक्षित आहे. तिला भल्या बुर्याची जाणीवच  नाही . मग परिवर्तन कसे होणार? त्यावर त्यांनी एक उपाय काढला प्रत्येक घरातील मुलगी शिक्षित झाली तर तिचे कुटुंब शिक्षित होईल. पर्यायाने संपूर्ण समाज सुधारण्यास गती मिळेल . त्यांनी ठामपणे निर्णय केला . एका द्रुढ निश्चयाचा संकल्प सोडला . आज या क्षणा  पासून सुरवात करायची . त्यांनी योजनेला स्वताच्याच घरा पासून सुरवात केली . त्यांनी व त्यांची पत्नी सावित्री बाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा काढली ; ती स्वतःच्या शेतात . शेतातील मातीवर आंब्याच्या काठीने अक्षरे गिरवायला शिकवले जाई . या विद्यालयात "सगुणा बाई क्षीरसागर व सावित्री बाई फुले"हेच तिचे विश्व राहिले असते.  या पहिला विद्यार्थिनी होत्या . सावित्री बाईंची भारतातील पहिली महिला शिक्षिका म्हणून इतिहासात गौरवशाली नोंद केली गेली . 
          त्या कालच्या काळच्या धर्म पंडितांनी आकांड -तांडव केले. त्यांना अश्लील शिव्या दिल्या , त्यांच्या वर वाईट आरोप केले, त्यांना दगड मारले , त्यांच्यावर शेणाचे गोळे फेकले . धर्म बुडवल्याचे आरोपही केले. तर एका धटिंगणाने रस्त्यात त्यांचा हात पकडला . या अनपेक्षित हल्ल्याने प्रथम त्या बावरल्या . क्षणातच त्यांनी त्या धटिंगणाच्या मुस्काटात एक लगावून दिली . या प्रकार मुळे पुढे त्यांच्या छळ थोडा कमी झाला . असे नाना विध छळ  सोसून मोठया जिद्दीने त्यांनी पुण्यातच ३ शाळा काढल्या आणि महिलांना शिक्षण देण्याचे खडतर व्रत आरंभिले . 
             त्यांच्या तपस्येतूनच आजची महिला शिक्षित झाली .  नव- नवीन क्षितिजे पादांक्रांत करण्याचा मान सावित्री बाईंच्या खडतर तपस्ये मुळेच त्यांना मिळाला . सावित्री बाई फुले नसत्या तर आज इंदिरा गांधी , कल्पना चावला , शुषमा स्वराज , सानिया मिर्झा  याही झाल्या नसत्या . आजची नारी आधुनिक झाली नसति. तिची धांव फक्त घराच्या कुंपणा पर्यंतच मर्यादित राहिली असति. फक्त "चूल आणि मुल" हेच तिचे विश्व राहिले असते. दिगन्ताच्या परिघात तिला अस्तित्वच राहिले नसते. म्हणूनच आम्ही गर्वाने म्हणतो. "आम्ही सावित्रीच्या लेकी "   जय महाराष्ट्र !


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा