रविवार, २७ जुलै, २०१४

pikale pan

        मी एक पिकले पान ! कोणत्याही क्षणी झाडावरून गळून पडेन . म्हणूनच मी माझे मनोगत तुमच्यापुढे मांडत आहे. झाडावरचे आमचे आयुष्य म्हणजे एक, दोन, किंवा तीन ऋतू . प्रत्येक ऋतू मुळे आम्हाला नवनव्या गोष्टी अनुभवायला मिळतात .
          ग्रीष्माच्या कडाक्याने बरीच वृक्ष-वल्ली ओकी-बोकी झालेली असते. मग येतो वसंत. सर्व वृक्ष-वल्ली एखाद्या जादुगाराने जादूची छडी फिरवल्यावर कायापालट होतो ना ? अगदी तसाच निसर्गाचा कायापालट होऊ लागतो. प्रत्येक झाडाला नवीन पालवी फुटते . सगळी वसुंधरा जणू चैतन्यमय होऊ लागते . चैत्र महिन्यापासून ते श्रावण महिन्या पर्यंत सृष्टीत सगळीकडे हिरव्या रंगाची उधळण झालेली असते. सगळी सृष्टी आनंदाने डोलत असते. संपूर्ण जीव सृष्टी आनंदमय होऊन जाते.
           आमचे पानांचे आयुष्य फक्त तीन ते नऊ आठवडे . यातही आम्ही संपूर्ण जीव सृष्टी साठी झटत असतो. हिवाळ्यात झाडांना पालवी आल्यापासून उन्हाळ्या पर्यंत झाडांची पाने हिरवीगार असतात. तेव्हा आम्ही पाने सूर्य प्रकाश, क्लोरोफिल, पाणी यांच्या सहाय्याने जोमाने अन्न तयार करण्याचे काम करत असतो. या वेळेस देखील पानांमध्ये इतर रंग असतात; पण क्लोरोफिलच्या मुळे ते दिसून येत नाही. उन्हाळा संपला कि सूर्य प्रकाश कमी होऊ लागतो. मग आमचा हिरवा रंग कमी होऊ लागतो. आणि दोन-तीन आठवड्यातच आम्ही पिकली पाने झाडावरून गळून जमिनीवर पडतो.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा