मंगळवार, २२ जुलै, २०१४

Lokmanya Bal Gagadhar Tilak

        "माझा आवडता नेता " म्हणजे लोकमान्य बाळ  गंगाधर टिळक . आजकाल पावसाळ्यात उगवणाऱ्या भू छत्रासारखे अचानक उगवणारे नेते मंडळी आपण टीव्हीवर सतत पाहतच असतो. समाज सेवा म्हणजे काय? याचा साधा अर्थ सुद्धा यांच्या लेखी नसतो. स्वतःची मलिन झालेली प्रतिमा पांढरे झगे घालून समाज सेवकाची पाटी  लावून समाज सेवक असल्याचा देखावा करायचा . अडल्या नडल्या लोकांना अजून त्रास द्यायचा आणि आपली तुंबडी भरून घ्यायची .  थोडक्यात काय तर  पांढर पेशी दरोडेखोर.
        इंग्रजांच्या गुलाम गिरितुन भारताला स्वातंत्र्य मिळवून देणारे अठराव्या शतकातील नेते मंडळीच मनाला स्पर्शून जातात . स्वतःच्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून देशासाठी बलिदान करणारे हि नेते मंडळी , यांच्या पासंगाला तरी आजची नेते मंडळी उभी राहू शकतात काय? त्याकाळी ब्रिटीशांच्या विरोधात ब्र काढायची सोय नव्हती . भारतीयांची अवस्था मुके-बहिरे , अपंग अशी होति. कितीही  छळ  झाला तरी निमुटपणे सहन करण्यावाचून गत्यंतर नव्हते. जर का कोणी या अन्याया विरोधी आवाज उठवलाच तर तो "राज द्रोह " ठरत असे. अश्या काळी लोकमान्य टिळकांनी ब्रिटीश सरकार विरोधी आवाज उठवला . स्वतः उच्च शिक्षित असून त्यांनी समाज सेवेचे व्रत अंगिकारले . प्रथम ते बी. ए . झाले , नंतर एल . एल. बी . चे शिक्षण घेऊन पदवी मिळवली . पण त्यांनी या शिक्षणाचा उपयोग स्वतःसाठी न करता देशासाठी केला . त्यांना राष्ट्र सेवेसाठी जीवन अर्पण करायचे होते .
            टिळकांचा जन्म रत्नागिरी येथे एका ब्राह्मण कुटुंबात झाला . त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर व आईचे  नाव पार्वतीबाई  असे होते . त्यांचे पूर्वज सात-आठ  पिढ्या चिखली गावचे खोत म्हणून प्रसिद्ध होते . त्यांचे वडील शिक्षक  होते आणि संस्कृतचे पंडित होते. टिळक लहानपणा पासूनच हुशार होते. गणित विषयाची त्यांना फार गोडी होती . टिळकांना अन्याया बद्दल लहानपणा पासूनच चीड होती . पुढे त्यांच्या वडिलांची बदली पुण्याला झाली . तेथे त्यांना वेगवेगळ्या प्रसिद्ध शिक्षकांच्या हाताखाली शिकण्याची संधी मिळाली .
          १८७२ मध्ये त्यांनी डेक्कन कॉलेज मध्ये प्रवेश घेतला . तेथे त्यांच्या देह यष्टीवर सर्व मुले हसत असत . म्हणून त्यांनी कसरत करून एका वर्षात आपली मजबूत देहयष्टी बनवली . त्य बरोबरच कुस्ती, पोहणे, नौका चालन  हे त्यांचे आवडते खेळ होते . १८९६ ते १८९७ या काळात प्लेगची साथ आली . हा रोग संसर्गजन्य असल्यामुळे त्याचा प्रसार रोखण्यासाठी  ryand  या अधिकाऱ्याची  निवड झाली . त्याने निर्जन्तू करणा च्या नावाखाली देव, देवघरांचा मान ठेवला नाही. त्याच्या सैन्याने लोकांवर अतोनात अत्याचार केले. त्यावर टिळकांनी केसरी व मराठा वर्तमान पत्रातून randchya कार्य पद्धतीवर आसुड  ओढले  . त्यानंतर चाफेकर बंधूनी रानड व त्याच्या सहकाऱ्याची गोळ्या घालून हत्या केली . या प्रकारामुळे चाफेकर बांधून फाशी देण्यात आली . तेव्हा टिळकांनी "सरकारचे डोके ठिकाणावर आहे का "? व "राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे" हे दोन अग्र लेख लिहिले. म्हणून त्यांच्यावर राज द्रोहाचा खटला भरण्यात आला .व त्यांना सश्रम कारावासाची १८ महिन्याची शिक्षा सुनावण्यात आली .
           धर्मनिरपेक्ष विषयांवर लोकांनी एकत्र येण्यासाठी त्यांनी गणेशोस्तव व शिवजयंती हे उत्सव सुरु करून लोकांना आपले विचार इतरान पर्यंत पोहचवण्यासाठी व्यासपीठ मिळवून दिले. अश्या जहाल विचार सारणी बरोबरच आपले सर्वस्व देशसाठी अर्पण करून समाज कार्य करणाऱ्या अश्या नेत्यांचा आदर्श आजच्या पिढीने आपल्या समोर ठेऊन समाज सेवा करावी. म्हणजे आजही समाजाला नवीन दिशा मिळेल . 

1 टिप्पणी:

  1. Emperor Casino - Shootercasino
    Play at the 제왕 카지노 롤링 Emperor Casino at Shootercasino for real money with Free Spins No Deposit needed. Enjoy your favorite Slots from all over the world!

    उत्तर द्याहटवा